ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाव , घर पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे : विजय देवणे; पक्ष संघटना मजबुतीसाठी संपर्क अभियान

मुरगुड  प्रतिनिधी :

शिवसेना व्यक्तिगतरित्या मदत करणारा एकमेव पक्ष आहे . ती रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे . कोरोनातही पक्षाने जबाबदारीने काम केले आहे . येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा अध्यक्ष, सभापती व्हावा .यासाठी येत्या दोन वर्षात गाव आणि घर पातळीवर संघटना मजबूत करण्याचे पक्षाचे धोरण आहे . पक्षाची बांधणी ही मजबूत असेल तरच पक्षाबरोबर नेताही मोठा होतो .त्यासाठीच शिवसेना संपर्क अभियान राबवले असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमूख विजय देवणे यांनी सांगितले .

मुरगूड येथे नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या शिवसेना संपर्क अभियानाच्या जिल्ह्यातील समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी कोरोणा काळात चांगले काम केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ, नगर परिषदेचा आरोग्य विभागाचा स्टाफ, महापूर काळात विद्युत पुरवठा करणारे वीज वितरणचे कर्मयारी, रेस्क्यु फोर्स यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी अॅड.वीरेंद्र मंडलिक म्हणाले, २०१६ च्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने लोकनियुक्त नगराध्यक्षा बरोबर एकहाती यश मिळविले आहे . नगरपालिकेच्या समोरील प्रांगणामध्ये येत्या दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले . शिवसेनेची कागल तालुक्यात गाव तिथे शाखा, युवा सेना याचे जाळे निर्माण करणार आहे . येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने सत्ता मिळवावी यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले .

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे म्हणाले ,पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला आहे .संकटाच्या काळात धीराने, संयमाने त्यावर मात करण्याची हातोटी ठाकरे यांनी दाखवली आहे.

यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत प्रास्ताविकात महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री होणे नाही . कोरोणा नियंत्रणासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांमधून मुख्यमंत्री ठाकरे यांचे कार्य इतर मुख्यमंत्र्यापेक्षा उजवे ठरले आहे .

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती शिवानी भोसले, पंचायत समिती सदस्य विजय भोसले ,उपनगराध्यक्ष सौ रंजना मंडलिक ,शिवसेना तालुका उपप्रमुख मारुती पुरीबुवा ,संदीप कलकुटकी ,सुहास कराडे , विभागप्रमुख दिग्विजय पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks