जनतेच्या समस्या निवारणासाठी हक्काचा माणूस हवा : प्रा. जालंदर पाटील

कुडूत्री प्रतिनिधी :
सामान्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस हवा.आणि तो आपणच निर्माण केला पाहिजे,तरच तालुक्यातील समस्या काही अंशी सुटण्यास मदत होईल. आणि विकासाला हातभार लागेल.त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील यांनी सेवानिवृत्ती निमित्य राधानगरी तालुका साहित्य-संस्कृती मंचने आयोजित केलेल्या कुडूत्री(ता.राधानगरी )सत्कारप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. के,पाटील होते.
पाटील पुढे म्हणाले “आजकाल समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी हातावर मोजण्याइतपत मंडळी पुढे येत आहेत. शेतकरी जगला तरच देशाचे भवितव्य उज्वल घडेल.त्याचं बरोबर साहित्यिक, पत्रकार,यांनीही आपल्या लेखणीतून समाज हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. साहित्यिक यांनी साहित्य चळवळीला बळ आणून
आपल्या लेखणीतून समाज हिताचे प्रश्न मांडले पाहिजेत.
कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत साहित्य मंचच्या वतीने करण्यात आले.तर प्रास्ताविक मधुकर मुसळे सर यांनी केले. प्रारंभी कार्यक्रमात थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन प्राध्यापक जालंदर पाटील, पी.बी.कवडे, एस. के. पाटील. अनिल बडदारे, बंडोपंत किरुळकर,संजय डवर, आदींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्राध्यापक जालंदर पाटील यांना घोंगडी, काठी, आणि आसूड,शाल,बुके, देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात एस. के. पाटील, पी.बी. कवडे, मधुकर मुसळे, राजेंद्र पाटील, प्रा. पी. एस. पाटील, संजय डवर,आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमात दिगंबर टिपूगडे यांच्या गीत संग्रहाचे प्रकाशन प्रा.जालंदर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राधानगरी तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल अशोक एरुडकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्राध्यापक जालंदर पाटील, एस. के. पाटील. बंडोपंत किरुळकर, पी.बी. कवडे, अनिल बडदारे, प्रा.पी. एस. पाटील, प्रा.बि.के.पाटील,मधुकर मुसळे, मारुती मांगोरे, संजय डवर, तानाजी पाटील, विक्रम वागरे, दिगंबर टिपुगडे, प्रकाश कानकेकर, अशोक एरुडकर,चंद्रकांत वागरे,सुरेश डवरी,रामचंद्र चौगले ,जनार्दन चौगले,रोहित पारकर,प्रकाश चौगले,रंगराव डवर,सुभाष चौगले,आदी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी तर आभार बि.के. पाटील सर यांनी मानले.
आगळा वेगळा सत्कार. . .
एखाद्या कार्यक्रमात फेटा,शाल,बांधून सत्कार केला जातो पण प्रा.जालंदर पाटील यांचा सत्कार,घोंगडी,काठी,आणि आसूड देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराने ते भारावून गेले.