ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : शेणगांव मध्ये पुन्हा २०१९ ची पुनरावृत्ती; पूर परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता; १५ ते २० घरे पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत.

कोल्हापूर :

ऑगस्ट २०१९ च्या वेळच्या पुराच्या आठवणी अजून ताज्या असताना आज पुन्हा शेणगांव (ता.भुदरगड) येथील वेदगंगा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. नदीकडील बाजूची सुमारे १५ ते २० घरे पाण्याखाली गेली असून येथील कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

भुदरगड तालुक्यात २०१९ मधील ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराचा सर्वाधिक शेणगांव या गावाला बसलाpppppp होता. येथील सुमारे ५ घरे या महापुरामुळे उध्वस्त झाली होती. तर १० हून अधिक घराची पडझड झाली होती. 

मागील ०१ वर्षात या आपत्तीग्रस्त कुटुंबांनी आपला संसार पुन्हा नव्याने उभा केला होता तोच आता पुन्हा या कुटुंबाना आपली घरे खाली करावी लागली आहेत. २०१९ पेक्षा देखील आत्ताच्या पावसामध्ये अधिक तीव्रता व जोर असलेने प्रशासनाकडून नदीकडील कुटुंबाना सतर्कतेचा इशारा देनेत आला आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी या भागाची पाहणी केली जात आहे. 

राधानगरी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर, भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी वरोटे-अडसूळ यांनी आज पूर परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक प्रशासनाला विवध सूचना केल्या. 

सर्कल राहुल धाडणकर, सरपंच सुरेश नाईक, ग्रामसेवक संभाजी खाडे, तलाठी राजेश राठोड, पोलीस पाटील विजय साळोखे हे वेळोवेळी पूर सदृश्य भागाची पाहणी करून सूचना देत आहेत. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks