जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण : प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्याला 18 वर्षापुढील 31 लाख 26 हजार 917 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यापैकी सुमारे 10 लाख 77 हजार 680 नागरिकांच्या पहिल्या डोसचे तर 3 लाख 94 हजार 280 नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण झाल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.
जिल्हा कार्यबल गटाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आली.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, 60 वर्षापुढील 78 टक्के नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे हे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक असून दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची टक्केवारी 44 टक्के इतकी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्राप्त होणाऱ्या एकूण लसीपैकी 90 टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने देण्यात येणार असून लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, बालरोग तज्ज्ञ डॉ. संगिता कुंभोजकर, डॉ. फारुक देसाई, डॉ. अमोल माने, मनपा आरोग्य आधिकारी डॉ. पावरा, डॉ. सुहासिनी कडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.