मुदाळच्या प्रतिक पाटीलचे जीईई परीक्षेत उल्लेखनीय यश

मुदाळतिट्टा प्रतिनिधी :
फेब्रूवारी २०२१ मध्ये एन.टी.ए.च्या वतीने घेण्यात आलेल्या जीईई मेन्स परीक्षेत प.बा.पाटील सायन्स अँकेडमीचा विद्यार्थी कु.प्रतिक प्रकाश पाटील याने ९६.८९% पर्सटाईल गुण प्राप्त करुन यश मिळविले याबरोबर कु पाटील वैष्णवी ९४.२५%,कु वेदांत कृष्णात पाटील ९२.६८% कु आभिषेक चव्हाण ९०.२१% लखन खानसोले ८९.१३, पाटील गिरीश नामदेव ८८.७८% कु यादव स्नेहा ८४.५१% ,चव्हाण पृथ्वीराज ८३.८७,पोतदार सिध्देश ७९.११%, भोईटे वेभव ७८.२५% डवर दिग्वीजय ७५.३५% पर्सटाईल प्राप्त करुन अॅकेडमीची यशाची पंरपंरा कायम ठेवली. यशप्राप्त विद्यार्थ्यांची निवड जूलै २१ मध्ये होणाऱ्या अँड़व्हान्स परीक्षेसाठी झाली आहे.
या विद्याथ्र्याना संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार के.पी.पाटील,खजानीस ,जिल्हा बॅंक संचालक रणजितसिंह पाटील,सचिव विकास पाटील भैया यांचे प्रोत्साहन तर अँकेडमीचे सर्व प्राध्यापक कर्मचारी सुमहाचे मार्गदर्शन लाभले