तावडे हॉटेल येथील प्रवेशद्वार कमानीच्या जाहिराती संदर्भात संभाजीराजे छत्रपती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कडक कारवाई करण्याचे उपायुक्त यांना दिले निवेदन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज दिनांक 24 जुन 2021 रोजी श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त श्री आडसुळे साहेब यांना कोल्हापूर शहराची तावडे हॉटेल येथील प्रवेशद्वार कमानीच्या जाहिराती संदर्भात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी 26 जुन राजर्षि शाहू छत्रपती महाराज यांच्या जयंती पूर्वीकारवाई करावी असे फाऊंडेशनच्या वतीने विनंती करण्यात आली.
या बरोबर करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी छ्त्रपती यांच्या कावळा नाका चौक येथील अश्वारूढ पुतळ्या जवळील नाम फलकात करवीर संस्थापिका छ. ताराराणी असा उल्लेख आहे तर ते तसे नसून करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी असा करावा म्हणुन त्या संधर्भात श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फाउंडेशन तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.