ताज्या बातम्या
गायक शिक्षक मंच कडून कोरणा रुग्णांचे मनोरंजन; कापशी कोविड केंद्रात राबविला विधायक उपक्रम

सेनापती कापशी :
गायक शिक्षक मंच कोल्हापूर यांचे वतीने कापशी कोविड केंद्रात असणाऱ्या रुग्ण व डॉक्टरांच्या मनोरंजनाकरीता गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला. शिक्षक गायक मंचचे प्रमुख अजित कांबळे सर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हिंदी व मराठी गाण्यांच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन करण्यात आले. यावेळी या केंद्राचे सर्वेसर्वा शशिकांत खोत व सुनिल चौगुले यांनी गायलेल्या सलामत रहे दोस्ताना हमारा या गाण्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमात गायक मंच चे प्रमुख अजित कांबळे, आर . ए. कांबळे ,डि.एस. कौशल, सारंग सर, सहदेव कांबळे , प्रकाश वांद्रे , अमर चोपडे , सारिका मॅडम व ज्ञानेश्वर चौगले या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.