ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राऊतवाडीचा देखणा धबधबा प्रवाहित; प्रवेश बंदीमुळे फिरवली पर्यटकांनी पाठ

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले

राधानगरी पासून ५ कि.मी.अंतरावर असलेला प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो. या देखण्या आणि मनाला भुरळ घालणाऱ्या धबधब्याला दरवर्षी पर्यटक न चुकता हजेरी लावतात.पण गेल्यावर्षी पासून कोरोनाचे सावट पाहता येथे बंदी असल्याने पर्यटक यांनी पाठ फिरवली आहे.पर्यटनाच्या जीवावर आधारित अनेक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.तर नियम मोडून येणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे.

मागील चार पाच दिवसात मोठा आणि मुसळधार पाऊस झाल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे.या धबधब्याला देखणं सौंदर्य प्राप्त झाले आहे.

राधानगरी तालुक्याचा पश्चिम भाग हा सृष्टी सौंदर्य यांनी नटला आहे.हा भाग दरवर्षी पर्यटकांना भुरळ घालतो. त्यामध्ये दाजीपूर अभयारण्य, राधानगरीचा लक्ष्मी तलाव,तसेच शेजारी असणारा काळमावाडी येथील राजश्री शाहू सागर,तुळशी धरण, आदी प्रेक्षणीय स्थळे या मुळे या तालुक्याची ख्याती वाढली आहे.या मध्ये आणखीन एक भर पडली आहे ती म्हणजे प्रसिद्ध राऊतवाडी येथील धबधबा याची हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक हजेरी लावतात पण दोन वर्षे पर्यटक कोरोना प्राश्वभूमीच्या बंदीमुळे फिरकले नाहीत.

पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या राधानगरीत मागील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस झाला त्यामुळे हा धबधबा उंचावरून कोसळू लागला आहे.त्याच बरोबर परिसरातील लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत.

याच धबधब्या शेजारी आर्थिक गुजराण व कुटुंब चालवणारे छोटे- छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले असुन गेले दोन वर्षे आर्थिक उपन्ना पासून वंचित आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks