बार्टी तर्फे कागल तालुक्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विभाग कोल्हापूर यांच्या वतीने कागल तालुक्यातील विविध गावात दिनांक 5 जुन ते 20 जुन वृक्षारोपण पंधरवडा आयोजन बार्टी समतादुत मा.किरण चौगुले यांनी केले आले. त्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत पिंपळगाव खुर्द परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनेर्ली परिसर,दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हणुर परिसर, विद्या मंदिर बामणी परिसर ,विद्या मंदिर एकोंडी या सर्व ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी यावेळी अशोक, पाम, फणस, पेरू,आंबा अशा प्रकारची झाडे लावण्यात आली.
यावेळी छ. शाहू साखर कारखाना संचालक मा.सचिन मगदूम ,कागल पंचायत समिती सभापती सौ.पुनम मगदूम , ग्रामसेवक अजित जगताप , बाळू पाटील ,प्राथमिकआरोग्य केंद्र चे डॉ.अरुण गवळी रावसाहेब पाटील, डॉ.सचिन ताडे ,राहुल महाडिक, सुधीर वाईगडे एकोंडिचे सरपंच प्रकाश सुलगावे, बामणी गावाचे सरपंच रावसाहेब पाटील, ग्रामसेवक संग्राम खाडे. मुख्याध्यापक शारदा मगदूम , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उज्वला पाटील, एस वी कोंडेकर सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व नागरिक उपस्थित होते. सप्ताहाचे आयोजन बार्टी चे महासंचालक मा.धम्मज्योती गजभिये , विभाग प्रमुख मा.मेघराज भाते कोल्हापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

विद्या मंदिर बामणी या ठिकाणी वृक्षारोपण करताना सरपंच रावसाहेब पाटील बार्टी समता दुत किरण चौगुले ग्रामसेवक संग्राम खाडे उज्वला पाटील व सर्व नागरिक उपस्थित होते.