संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या फी माफीच्या आंदोलनाची घेतली दखल.

NIKALWEB TEAM :
महाविद्यालयातील अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी आणि ट्युशन फी मध्ये ५०% सवलत मिळण्यासाठी संयुक्त विद्यार्थी संघटने चे पदाधिकारी गेले १० महिने प्रत्येक स्तरावर लढा देत आहेत. याच बाबत सरकार कडून काहीही निर्णय होत नव्हता यामुळे दि. १० जून २०२१ पर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय सांघटनेचे मा. प्रदेशाध्यक्ष यांच्या सह सर्व पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता.
सरकार च्या याच आश्वासनांना कंटाळून संयुक्त विद्यार्थी संघटने मार्फत “#माझेट्विटफिमाफीसाठी” हे ऑनलाईन आंदोलन छेडण्यात आले, या आंदोलनाला राज्यातून भहरभरून प्रतिसाद मिळाला होता याच बरोबर संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला राज्यातील इतर बड्या संघटनांचा पाठिंबा मिळाला होता याच मुळे हा हॅशटॅग काही काळ ट्रँडिंग देखील राहिला होता.
याच आंदोलनाची आणि संघटनेने विविध पातळीवर दिलेल्या लढ्याची दखल घेत मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी दि. १८ जून २०२१ रोजी मा. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश मा. विजय आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली फी फिक्सेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व पातळीवर काम करत माहीती घेऊन अहवाल तयार करणार आहे. समितीच्या अहवालात नक्की कोणते मुद्दे समाविष्ट असतील याकडे विद्यार्थ्यांसह पालकवर्गाचे लक्ष लागले आहे.