मुरगूड मधील एकूण कोरोना रुग्ण संख्या पोहोचली दोनशेवर; अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय सुरू असलेल्यांवर मुरगुड पोलिसांची धडक कारवाई

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड शहरात आज एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या दोनशे वर पोहोचली आहे तर 31 ॲक्टिव रुग्ण शहरात आहेत.तर 162 जण बरे होऊन परत आले आहेत तर सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे.दरम्यान आज शहरात मुरगूड पोलिसांनी धडक कारवाई करत ज्या दुकानांना दुकान सुरू करण्याची परवानगी नाही अशा 18 दुकानांवर कारवाई करत तीन दुकानांना सील करण्यात आले यावेळी एकूण नऊ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच विनामास्क फिरनाऱ्यांवर कारवाई करत रुपये चार हजार तीनशे इतका दंड वसूल करण्यात आला तसेच आठ वाहने जप्त करण्यात आली. मुरगूड शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढली आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून इतरही दुकान चालू आहेत अशी माहिती समजताच मुरगुड चे पीएसआय विकास बडवे किशोर कुमार खाडे आणि मुरगूड पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी जे दुकान अत्यावश्यक सेवा सोडून इतर व्यवसाय करत आहेत अशा दुकानांवर कारवाई केली तसेच विना मास्क फिरणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली.