ताज्या बातम्या

महा ई सेवा केंद्र व शाहू सुविधा केंद्र सुरु करावा : काशिनाथ गडकरी

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार

कोरोनाच्या महामारीमुळे शासकीय कार्यालये गेल्या काही कारणास्तव शासनाच्या आदेशानुसार बंद आहेत. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत चालला आहे . राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे . त्यामुळे राज्यात काही ठिकाणी शासकीय कार्यालये सुरू झालेली आहेत. परंतु गडहिंग्लज तालुक्यासाठी असणारे महा – ई – सेवा केंद्र , शाहू सुविधा केंद्र हे आजूनही बंद आहेत .त्यामुळे आवश्यक असलेली कागदपत्रे व संजयगांधी निराधार बँकेसाठी लागणारी कागदपत्रे अशी अनेक शासकीय , निमशासकीय संस्थेला लागणारे दाखले न मिळाल्याने सर्व जनतेची कामे थांबलेली आहेत. त्यामुळे या सेवा केंद्राला कोरोनाचे नियम व अटी घलून वरील कार्यालये सुरू करावा. या आशयाचे निवेदन गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांनी तहसीलदार दिनेश पारगे यांना दिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks