आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
शट्टीहळी ता. हुक्केरी येथील वर्षा विश्वास पाटील हिची सशस्त्र सीमा बल मध्ये निवड झाली आहे. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. यासाठी तिला वडील विश्वास,आई सौ. विद्या, भाऊ विवेक, बहीण मयुरी यांचे मार्गदर्शन लाभलेचे तिने सांगितले.
याच गावातील संजय शिवाजी पाटील याची बी. एस. एफ. मध्ये निवड झालेने गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासाठी त्याला वडील शिवाजी यांचे मार्गदर्शन लाभले तर आई स्व. रेणुका (सुमन) यांचा आशीर्वाद लाभल्याचे त्याने सांगितले.