मुदाळच्या रणजितदादा युवा शक्ती जम्बो कोविड सेंटरला मदतीचा ओघ; भुदरगड तालूका शेत.सह. संघाचे वतीने कोविड सेंटरला सामाजिक बांधिलकी म्हणून ५१००० रुपये रोख रक्कमेचा धनादेश

मुदाळ प्रतिनिधी : प्रकाश पाटील
मुदाळ येथे रणजितदादा युवाशक्तीच्या वतीने सुरु असलेल्या कोविड केंद्राला समाजातील सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. कोरोना महामारीची दूसरी लाट,त्याची भिषणता लक्षात घेवून गोकुळ,व जिल्हा बॅंक संचालक रणजितसिंह पाटील यांनी आपल्या संकुलात शंभर बेडचे कोविड सेटंर उभे करुन सामान्य रुग्णाना दिलासा दिला आहे. सेंटर मध्ये उपचार,जेवन,नाष्टा,वैद्यकीय सर्व सुविधा विनामुल्य राबविल्या असल्याने अनेक सेवाभावी संस्था, सहकारी संस्था,दानशूर कार्यकर्ते मदतीसाठी पूढे येत आहेत. सेंटरमधील सेवाभाव ,रुग्णावर उपचार,वैद्यकीय सेवा ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याची चर्चा होत असल्याने सेवाभाव म्हणून अनेक मदतीचे हात पूढे येत असल्याची भावना रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
भुदरगड तालूका शेत.सह. सं घाचे वतीने आज कोविड सेंटरला सामाजिक बांधिलकी म्हणून ५१००० रुपये रोख रक्कमेचा धनादेश संघाचे अध्यक्ष बाळ देसाई,एम.डी.पाटील,यांचे हस्ते रणजितसिंह पाटील यांचेकडे प्रदान करणेत आला प्रसंगी संचालक प्रा.एच.आर.पाटील,संतोष पाटील,देवेंद्र मोरबाळे,प्रा.विजय कोटकर,सर्जेराव देसाई,सदाशिव मोरे,विजय आबिटकर आदी उपास्थित होते तर उंदरवाडी येथील दत्त दूध सह व्याव. संस्था चे वतीने बिद्री संचालक गणपतराव फराकटे यांचे वाढदिनाचे औचित्य साधुन रुग्णाना फळाचे किट चेअरमन मारुती पाटील यांनी विकासराव पाटील भैया यांचेकडे सुपूर्द केले यावेळी गणपतराव फराकटे ,काशिनाथ कांबळे,नेताजी कांबळे,संभाजी पाटील ,शामराव पाटील केशव पाटील ,राजू गौड आदी उपास्थित होते.मुदाळचे मा.उपसरपंच शातांराम पाटील यांनी सर्व रुग्णास वाढदिनाचे औचित्य साधुन भोजनाची सर्व रसद दिली.
एकूणच कोविड सेंटरला मदतीची मिळालेली साथ रुग्णाच्या पाठीवर लढण्याची पडत असलेली थाप हया बाबी सेंटरला चालना देणाऱ्या ठरल्या असल्याचे मत रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.