ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मराठा आरक्षणला सर्वच राजकीय पक्ष, नेते यांचा पाठिंबा असताना मराठा आरक्षण का मिळत नाही : आ.चंद्रकांत जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

मराठा आरक्षणला सर्वच राजकीय पक्ष व नेते यांचा पाठिंबा असताना, मराठा आरक्षण का मिळत नाही ? आमदार चंद्रकांत जाधव यांनी मांडली आपली भूमिका

– मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबध्द आहे. राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडेल यात शंका नाही, मात्र आता केंद्र सरकारनेही मराठा आरक्षण प्रश्नी सकारात्मक भूमिका घेत घटना दुरुस्ती करावी. मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करणे गरजेचे आहे आणि घटना दुरूस्ती करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यामुळे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आता दिल्लीतच धडक मारावी लागेल. त्यामुळे आता दिल्ली गाठायची व आरक्षण मिळेपर्यंत दिल्ली सोडायची नाही असंही ते म्हणाले.
– राज्य सरकारने आरक्षण दिले ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी व उणिवा दाखवल्या आहेत. त्या दूर करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलवावे अशी मागणी आमदार चंद्रकांत पं. जाधव यांनी यापुर्वीच मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
– मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मराठा विद्यापीठाची स्थापना करावी.
– आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी सारख्या सवलती द्याव्यात.
-राज्य सरकारने भरघोस निधीची तरतूद करून सारथी सक्षम करावी.
-सारथीचे केंद्र कोल्हापूरात सुरू झाले पाहिजे.
-राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पुनर्गठण करून महामंडळासाठी निधीची तरतूद करावी.
-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मराठा विद्यापीठाची स्थापना करावी.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks