गारगोटी :
मिणचे बुद्रुक पैकी एका धनगरवाड्यावर १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने एका ७ वर्षाच्या बालीकेवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली असून या प्रकरणी १३ वर्षीय बालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिणचे बुद्रुक पैकी एका धनगरवाड्यावर २० फेब्रुवारी रोजी संबंधीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पीडीत बालीकेस शेणाची पाटी उचलण्यास मदत कर असे सांगून घरामध्ये नेली. त्यानंतर घरात कोणी नाही याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला अशी फिर्याद पिडीत बालीकेच्या आईने भुदरगड पोलिसात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी त्या १३ वर्षीय बालकास ताब्यात घेतले आहे. तो सातवीच्या वर्गात शिकत आहे. या अजब प्रकारामुळे पोलिस ठाण्यासमोर धनगर कुटुंबियांनी सोमवारी दिवसभर गर्दी केलेली होती.
Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications
OK
No thanks