व्हाट्सअप ग्रुप चा अनोखा उपक्रम ; 150वृक्षांचे शिवराज्याभिषेकदिनी वृक्षारोपण

सिद्धनेर्ली : शिवाजी पाटील
येथील स्वामी विवेकानंद व्हाट्सअप ग्रुप वर एका सामाजिक कार्यकर्त्याने सध्याच्या कोविड रोगाच्या पार्श्वभूमीवर आधारित पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक सामाजिक भान जपणारे पोस्ट फॉरवर्ड केली ,त्या पोस्टला ग्रुप वरील सर्व सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व युवक एकत्र आले व याच्या तुन गावचे आरोग्य व पर्यावरण सौंदर्य टिकवण्यासाठी सर्वांनी कृतिशील पाऊल उचलले..
सुरुवातीच्या काळात काही युवक एकत्र येऊन वृक्ष संवर्धन मंडळ स्थापन केले जसे काम चालू झाले त्या पद्धतीने कार्यक्षेत्र ही वाढू लागले आणि या पर्यावरण पूरक उपक्रमांमध्ये गावातील सर्व युवक, तरुण मंडळी,स्वेच्छेने सहभाग घेऊ लागले. त्यामुळे या मंडळाचं पुढे वृक्ष संवर्धन व पर्यावरण संघटना या मध्ये रूपांतर झाले आणि यातूनच गावच्या सर्वांच्या लोकसहभागातून सिद्धनेर्ली पहिली पाटी ते लोहार पानंद इथपर्यंत वृक्षारोपण करण्याचा मानस सर्वांनी हाती घेतला.
बघता-बघता गावातील सर्वच दानशूर व्यक्तींनी आपापल्या परीने तन मन धनाने यामध्ये सहभाग घेतला यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत सिद्धनेर्ली चे सरपंच दत्तात्रय पाटील. मा दिगंबर प्रधान (आयपीएस)वतसेच कोल्हापूर जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रा. सुनील मगदूम सर, महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरनाचे तपास अधिकारी मारुती मगदूम तसेच गावातील सर्वच सहकारी संस्था, सामाजिक संघटना, युवक वर्ग व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने आर्थिक सहकार्य केले.
सर्वांच्या सहकार्यातून आज 6 जून शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावांमध्ये मुख्य रस्त्याच्या दुतर्फा 150 पर्यावरण पूरक वृक्षाचे रोपण करण्यात आले.
या वृक्षारोपन उपक्रमांमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्र व धन निरंकार जी मंडळ यांनी श्रम दान केले…
या सर्वच उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य वन्यजीव विभागाचे सदस्य मा. सुहास वायंगणकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच या उपक्रमांमध्ये अमृत पाटील, मधुकर येवलुजे,धनाजी पोवार,उमाजी पोवार सर, संदीप मगदूम सर,संदीप गुरव सर,संजीव पोवार (पोस्टमन),सुधीर पाटील, रामदास कांबळे सर अरविंद उबाळे, युवराज पाटील सर, मोहन लाड, जैनुद्दीन मोमिन, विवेक पोतदार या सर्वांनी परिश्रम घेतले.