शेंडूरच्या कोविड केअर सेंटरला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून दोन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान…

कागल :
शेंडूर तालुका कागल येथील कोविड केअर सेंटरला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून येथील मानव हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर साकारले आहे. या सेंटरला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली भेट .
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून समाजसेवा करत रहा. गावोगावी उभारण्यात येणारी कोवीड केंद्र ही कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक जगदीश पाटील, सरपंच अमर कांबळे, उपसरपंच अजित डोंगळे, मधुकर मेथे, अशोक ढवण, गुणाजीराव निंबाळकर, शंकर पोवार, सुर्याजी निंबाळकर, लक्ष्मण गोरडे, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती निकम, ग्रामपंचायत सदस्य संदीप लाटकर,ग्रामपंचायत सदस्य निखिल निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉ. एस आर यादव, आरोग्य सेविका रणदिवे, तलाठी दीपा हुंम्बे, ग्रामसेवक एस. वाय. मगदूम, कृषी अधिकारी मंगल परीट, डॉ. अमोल ढवण, सुखदेव मेथे, अनिल मोरे, राजू मुजावर, बाबूराव शेवाळे, रणजीत निंबाळकर, पप्पू पोवार आदी उपस्थित होते.