गांधी मैदान येथे विष्णुपंत इंगवले कोव्हिड सेंटर चे उदघाटन!शिव सेना शहर प्रमुख रविकिरण इंगवलेनी दिलेला शब्द पाळला

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर शिवाजी पेठ गांधी मैदान येथे विष्णुपंत इंगवले कोव्हिड सेंटर चे झाले उदघाटन. या कोव्हिड सेंटर चे उदघाटन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मा. आमदार राजेश क्षीरसागर, उद्योगपती जयेशभाई कदम, कृती समितीचे निवासराव साळोखे,उद्योगपती जितु पाटील,सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई,डॉ. दिनेश चव्हाण,सुरेश जरग,शहर प्रमुख रविकिरण इंगवले,नगरसेविका तेजस्विनी इंगवले व भागातील नागरिक यांच्या उपस्थित झाले.
या कोव्हिड सेंटर मध्ये रुग्णांना किमान दिड महिने लागणारे औषध, गोळ्या, इंजेक्शन, फळे, मांसाहार, अंडी, सलायन्स, दोन वेळेचे जेवण, दोन वेळचा नाष्टा व चहा हे सर्व विनामुल्य देणेत येणार आहे.
कोविड सेंटरमध्ये दोन एम.बी.बी.एस. दोन बी. एच. एम. एस. चार सिस्टर, चार ब्रदर, चार हेल्पर व अन्य स्टाप सेवेत असणार आहे.
शिवाजी पेठेतील स्वखर्चाने कोविड सेंटर उभा करून रविकिरण इंगवले यांनी दिलेला शब्द पाळला अशी चर्चा भागात होत आहे.