कोगनोळी कॉंग्रेसप्रणित संस्थांच्या वतीने मास्कचे वितरण

कोगनोळी :
कोरोना कालावधीत आघाडीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, पत्रकार व वॉर्डातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना काँग्रेस प्रणित संस्थांच्या वतीने माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या हस्ते मास्कचे वितरण करण्यात आले.
पी अँड पी ग्रुप, अंबिका पतसंस्था, प्रियदर्शनी महिला पतसंस्था, दत्तगुरु पतसंस्था, प्राथमिक कृषी पत्तीन संघ, कामधेनु ॲग्रो यांचे सह विविध काँग्रेस प्रणीत संस्थांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील 10 वॉर्डातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याकडे त्या वॉर्डातील नागरिकांसाठीचे मास्क देण्यात आले.
यावेळी कोरोना बरोबरच काळ्या, पांढर्या व पिवळ्या अशाप्रकारच्या बुरशीजन्य आजारांची ही लक्षणे दिसू लागली आहेत. या सर्व गोष्टींना न घाबरता त्यावर औषधोपचार करून घ्यावेत. तसेच या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कुटुंब व परिसरामध्ये स्वच्छता राखणे ही महत्त्वाचे आहे, असे वीरकुमार पाटील म्हणाले.
यावेळी शरद पाटील, पंकज पाटील, बाळू पाटील, मारुती कोळेकर यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, अनिल चौगुले, सचिन खोत, जगन्नाथ खोत, अनिल कोंडेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.