ताज्या बातम्या
हेब्बाळ च्या करुणाची आसाम रायफल मध्ये निवड

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
हेब्बाळ जलद्याळ तालुका गडहिंग्लज येथील करूणा राजाराम कांबळे हिची आसाम रायफल मध्ये जनरल ड्युटी या पदासाठी निवड झाली. त्यामुळे तिचे परिसरात कौतुक होत आहे. सदर निवडीसाठी वडील सेवानिवृत्त ऑर्डनरी सुभेदार मेजर राजाराम कांबळे,आई सौ सुमन ,बहीण सौ कोमल,नायक भूमीचंद्र कांबळे,अनिल कांबळे ,भाऊ सिद्धार्थ यांचे मार्गदर्शन लाभलेचे तीने सांगितले.