सेवा हा भारतीय समाजाचा स्थायीभाव : भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
“कोरोनाचे संकट वेगळे आहे. याच्याशी मुकाबला कसा करायचा हे सुरुवातीला आपल्याला माहीत नव्हते. मात्र अशा अनिश्चिततेच्या काळातही भारतीय समाज स्वयंसेवक म्हणून पुढे आला. कारण सेवा हा आपला स्थायीभाव आहे. ब्राह्मण सभा करवीर यांनी सुरू केलेले कोवीड सेंटर हे त्याचे उदाहरण आहे.” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ब्राह्मण सभा करवीर आणि रा.स्व.संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलधाम येथे सुरू असलेल्या कोव्हिड केअर सेंटरला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते.
शहरात कोविडचा प्रकोप वाढल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी कोविड केअर सेंटर्स सुरू केली आहेत. कोल्हापुरात मध्यवर्ती ठिकाणी ब्राह्मण सभा करवीरच्या मंगलधाम या वास्तूत रा.स्व.संघ समितीच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरू आहे. पूर्णपणे मोफत चालणार्या या केंद्रातून आजपर्यंत 10 पेशंट खडखडीत बरे होऊन बाहेर पडले आहेत.त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलच्या सन 1982 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या सोसायटीने या केंद्रास देऊ केलेली औषधे सोसायटीचे मनीष बेंडके, अनिरुद्ध कोल्हापुरे, दिलीप पाटील, सन्मती कबूर, शिवराम कुलकर्णी आदि मान्यवरांनी आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपवली. त्यानंतर मार्गदर्शन करताना चंद्रकांत दादा पाटील यांनी पूर्णपणे मोफत चाललेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की,” या सेंटरवरील आपुलकीने काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी तसेच उत्तम व्यवस्थांचे नियोजन करणारी तुम्ही सर्व मंडळी यांचे सोबतच आई अंबाबाईच्या आशीर्वादामुळेच रुग्ण नक्कीच ठणठणीत बरे होऊन बाहेर पडतील.” हा प्रकल्प सुरू होण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. कोव्हिड मधून बाहेर पडल्यानंतरही अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात त्या समस्यांबाबतही काम सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर केंद्रात पूर्णपणे बरे होऊन डिस्चार्ज होणार्या पेशंटवर फुले उधळून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी, नगरसेवक अजित ठाणेकर,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, ब्राह्मण सभेचे कार्यवाह श्रीकांत लिमये, ज्येष्ठ संचालक डॉ.दीपक आंबार्डेकर, राम टोपकर, राम पुरोहित, जनकल्याण समितीचे मुकुल पाडगांवकर, सचिन नंदगावकर, सौ स्मिता गंभीर, अमर पारगावकर आणि अशोक जाधव, रवी साळोखे आदी उपस्थित होते.