सर पिराजीराव तलावास पाणी पुरवठा करणाऱ्या जांभूळखोरा कॅनॉलची पावसाळ्या पूर्वी स्वच्छता करा ; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता कागल येथील सरपिराजीराव तलावास जांभूळखोरा मधील कॅनॉल मधून पाणीपुरवठा होतो . तलाव प्रशासनाकडून कॅनॉलची स्वच्छता केली जात नाही . त्याची साफसफाई केली नाही तर पावसाळ्यामध्ये कॅनॉल फुटण्याची शक्यता आहे . तरी पावसाळ्या पूर्वी कॅनॉल स्वच्छता करुन व कोसळलेल्या दरडी काढून घ्याव्यात अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते समीर गोरूले यांनी तलाव प्रशासनाला दिला आहे .
मुरगूड, शिंदेवाडी,यमगे गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या सर पिराजीराव तलावाला पाणीपुरवठा जांभूळखोरामधून येणाऱ्या कॅनॉल मधून होतो . तो कॅनॉल पूर्वीप्रमाणे तलाव प्रशासनाकडून साफ केला जात नाही. तेव्हा पावसाळ्यामध्ये कॅनॉल फुटण्याची शक्यता आहे .
तलाव प्रशासनाला अनेक वेळा लेखी व तोंडी कळवले आहे . अनेकवेळा मोर्चे काढून आंदोलनाचे इशारे दिले होते. प्रसिध्दपत्रकाच्या माध्यमातून याबाबत याकडे लक्ष वेधले होते .
तरीही कॅनॉल स्वच्छ केल्याचा देखावाच केला जातो . ९० वर्षापूर्वी एकेठिकाणी कॅनॉल फुटला होता . तेंव्हा लोकवस्ती नसल्यामुळे जीवीत हानी झाली नव्हती . पण हजारो एकर शेतीचे नुकसान झाले होते.पावसाळ्यामध्ये कॅनॉल फुटला तर हजारो एकर शेतीचे नुकसान होणार आहे .तसेच जांभूळखोरा लोकवस्तीत जीवीतहानी झाल्यास तलाव प्रशासन त्यास जबाबदार राहील. तसेच कॅनॉलमध्ये दरडही कोसळल्या आहेत. पावसाळ्या पूर्वी कॅनॉल स्वच्छता करुन व कोसळलेल्या दरडी काढून घ्याव्यात अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे .