ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय….देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा

टीम ऑनलाईन :

महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एप्रिल महिन्यातील सुट्टीच्या दिवसांतही कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटची त्रिसूत्री केंद्र सरकार राबवतेय.
आता देशभरात सर्व शासकीय आणि खाजगी कोरोना लसीकरण केंद्रावर एप्रिल महिन्यातील सुट्टीच्या दिवशीही लस देण्यात येणार आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे, तिथे 2 आठवड्यांत लसीकरण करण्याच्या सूचनाही केंद्राने राज्यांना दिलेल्या आहेत.
वाढत्या लसीकरणासाठी राज्यांना मुबलक लसींचा वेळेवर पुरवठा केला जाईल, असंदेखील केंद्राने म्हटले आहे. लसीकरणाची मोहीम जरी वेगाने पुढे नेत असलो, तर लसीचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही केंद्राने दिली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks