मुरगूडमधील कुबेर रिअल इस्टेट यांच्यावतीने 100 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ( ता.कागल) येथील कुबेर रिअल इस्टेट यांच्यावतीने 100 गरजू कुटुंबांना कुबेरचे संस्थापक नवनाथ सातवेकर यांच्याकडून मुरगुडमधील लॉकडाऊन काळातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कुबेर परिवारामार्फत अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे मुरगूडमधील गोर-गरीब आणि गरजू लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे जाणून माणुसकीच्या नात्याने कुबेर परिवाराने हा उपक्रम हाती घेत मुरगुडचे नगरसेवक दत्तात्रय मंडलिक ,आंनदा मांगले,दगडू शेणवी,बजरंग सोनूले यांचे हस्ते या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी युवराज सूर्यवंशी, पांडुरंग पुजारी ,समाधान पोवार, अनिकेत नलवडे , राजु ढांगे ,तुषार साळोखे ,ओंकार म्हेतर, सुरज डेळेकर, संग्राम माडेकर, योगेश सारंग, किरण गुजर, समरजीत चव्हाण, प्रणव रामाणे, अथर्व चव्हाण , संतोष खंडागळे, रोहण चव्हाण ,गणेश तोडकर आदी उपस्थित होते.