कोल्हापूर : उडान फौंडेशन व उर्वी वुमन्स क्लब च्या माध्यमातून 30 हजार शेनी व 4 टन लाकूड स्मशानभूमीस प्रदान..

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात सुद्धा गरजू लोकांना मदतीचा हात आणि प्रशासनाला सहकार्य करत उडान फौंडेशन आणि उर्वी वुमन्स क्लब करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार नगरसेवक राहुल माने आणि प्रकल्प अधिकारी स्वाती शहा यांनी काढले. उडान फौंडेशन आणि उर्वी वुमन्स क्लब कडून आयोजित शेनी व लाकूड दान उपक्रम प्रसंगी ते बोलत होते.
गेले वर्षभर आपला संपूर्ण देश कोरोना सोबत लढतोय. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. स्वच्छता कर्मचारी, आशा सेविका, डॉक्टर, इत्यादी कोरोना योद्धे स्वतःच घरदार विसरून ही लढाई निकराने लढत आहेत. काही महिन्यांपूर्वी बधितांची संख्या कमी आली सुद्धा, पण काही दिवसांपासून पुन्हा दुसरी लाट सुरुवात झाली. या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे स्मशानभूमी वर भरपूर ताण आहे.
कोल्हापूर शहरात संपूर्ण जिल्ह्यातून ग्रामीण भागातील रुग्ण येतात. पण जेव्हा तो रुग्ण मृत म्हणून घोषित केला जातो, तेव्हा ते शव नातेवाईकांच्याकडे न देता ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमीतच त्यावर अंत्यसंस्कार केले जातात. कोल्हापूर मध्ये मृतांची संख्या जास्त असल्याने ४ ही स्मशानभूमीत जागा तर कमी पडतेच, शिवाय साहित्य सुद्धा कमी पडत आहे. यासाठी स्मशानभूमी प्रशासनाकडून वारंवार मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
मागील वर्षभरापासून ज्या ज्या वेळी स्मशानभूमीला गरज भासेल तेव्हा लागेल ती मदत करण्याचे काम उडान फौंडेशन कडुन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ३० हजार शेनी आणि ४ टन लाकूड स्मशानभूमींना देण्यात आल्याची माहिती उडान फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भुषण लाड यांनी दिली.
शेनिदान उपक्रमासाठी नगरसेवक राहुल माने, प्रकल्प अधिकारी स्वाती शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उडान फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भुषण लाड, उर्वी वुमन्स क्लब महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सारिका पाटील, रेखा उगवे, रोहन माने, सचिन पोवार, आदी सदस्य उपस्थित होते.