कामगारांना वेतन न दिल्यास जितेंद्र सिंग कंपनीच्या वाहनाचे चाक रस्त्यावर फिरु देणार नाही ; प्रविणसिंह पाटील यांचा इशारा.

मुरगूड प्रतिनिधी-
देवगड निपाणी राज्य मार्ग तयार करण्यासाठी जितेंद्र सिंग या कंपनीला काम देण्यात आले आहे.या कामासाठी येथील युवकांना कामावर घेतले होते.पण कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता त्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.कामावरुन कमी करीत असताना त्यांचा तिनं ते चार महिन्यांचा पगार दिलेला नाही.पगार मागत असताना अशा कामगारांना कंपनी प्रशासना कडुन उडवा उडवी ची उत्तरे मिळत आहेत.कामा वरून कमी केलेल्या कामगारांना त्यांचा थकलेला पगार त्वरीत द्यावा,त्यांना कामावर घ्यावे अन्यथा जितेंद्र सिंग कंपनीच्या एकाही वाहनाचे चाक या रस्त्यावर फिरु देणार नाही.मोठ जन आंदोलन करु असा इशारा मुरगुड चे माजी नगराध्यक्ष व बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिंह पाटील यांनी दै. तुफानशी बोलताना दिला आहे.यावेळी नगरसेवक राहुल व॓डकर संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, राजेंद्र आमते, सुधिर सावर्डेकर, नामदेव भांदीगरे, शिवाजी सातवेकर ,, राजेंद्र चव्हाण, सत्यजितसि॓ह पाटील,दिग्वीजय चव्हाण,विजय मे॓डके, पाडूर॓ग चव्हाण आदी उपसस्तीत होते