हलकर्णी महाविद्यालयात ‘प्रकाश आणि त्याचा उपयोग’ या विषयावर वेबिनार संपन्न.

नेसरी प्रतिनिधी: पुंडलिक सुतार
हलकर्णी तालुका चंदगड येथील यशववंतराव चव्हाण महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत ‘प्रकाश आणि त्याचा उपयोग’ या विषयावरील वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. डॉ. घाळी महाविद्यालय,गडहिंग्लज येथील डॉ. शिवानंद मस्ती प्रमुख व्याख्याते होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए. पाटील होते. प्रारंभी नॅक समन्वयक डॉ. आय. आर. जरळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश घोरपडे यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. जगातील सर्व संस्कृती मध्ये सुर्याला देवता मानले जाते. पृथ्वीवरील जीवन हे सूर्यामुळेच आहे. शास्त्रज्ञ, लेखक, कवी, चित्रकार, वनस्पती, किटक या सर्वांना सूर्याचा मोह आहे. आज त्याच्याच प्रकाशाचा उपयोग विविध गोष्टींसाठी केला जातो.ऑप्टिकल फायबर, कॅमेरा, मायक्रोस्कोप, बारकोड, लेसर ट्रिटमेंट, सोलार एनर्जी, मेडिकल इंडस्ट्रीज, छायाचित्रण इत्यादी गोष्टींमध्ये प्रकाशाचा वापर कसा केला जातो याचे विवेचन डॉ . मस्ती यांनी केले. निसर्गामध्ये घडणार्या घटना, इंद्रधनुष्य, ग्रहण, फोटोईलेक्ट्रिक इफेक्ट, प्रकाशाचे परावर्तन ,अपवर्तन अपस्करण,सूर्योदय-सूर्यास्त, मृगजळ ,दृष्टीदोष अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी दिली. यावेळी शिवराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस .ए. जोडगुद्री प्रा. रीना पाटील, प्रा. संजीवनी मुंगारे, प्रा. रेश्मा गवसेकर ,डॉ. चंद्रकांत पोतदार व विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये सहभाग घेतला.सूत्रसंचालन प्रा. एन. पी. पाटील यांनी केले. तर आभार प्रा.पी. एम. दरेकर यांनी मानले.