तारळे खुर्द येथे व्ही. के. पाटील जयंती साधेपणाने

तरसंबळे प्रतिनिधी :
तारळे खुर्द येथे जय हिंद दूध संस्थे मध्ये शेतकरी संघाचे संचालक विष्णुपंत पाटील यांची 16 वी पुण्यतिथी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने संपन्न. तारळे खुर्द येथील शेतकरी संघाचे संचालक विष्णुपंत तथा व्ही. के. पाटील यांची पुण्यतिथी नेहमीच विविध कार्यक्रमांनी संपन्न होते. मात्र यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर 16 वी पुण्यतिथी अगदी साधेपणाने जय हिंद दूध संस्थेच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन विलास गुरव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिवसभरामध्ये तालुक्यातील विविध मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली. यामध्ये गोकुळचे नूतन संचालक अभिजीत तायशेटे, काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर, युवा नेते अभिषेक डोंगळे, माजी सरपंच विश्वास पाटील यांनी उपस्थिती दर्शविली होती, तर या कार्यक्रमासाठी शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील, युवा नेते नेताजीराव चौगुले, जय हिंद विकास सेवा संस्थेचे चेअरमन भीमराव कांबळे, पी. आर. किल्लेदार, बी.ए. पाटील, ग्रामपंचायत सदस्य केरबा शेलार, मधुकर कांबळे, सचिव पी. टी. पाटील, नेताजी शेलार, सह संस्थेचे संचालक सभासद यावेळी उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले.