ताज्या बातम्या
बुद्ध जयंती निमित्त प्रसाद तरुण मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
सोशल डिस्टंसिंग चे पालन करून शिवाजी पेठेतील प्रसाद तरूण मंडळा तर्फे बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. बुद्धमूर्तीचे पूजन करून बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले.याप्रसंगी वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी अमोल कुरणे,परेश बनगे, प्रतिक कुरणे,अक्षय साळवे,शरद कांबळे, अविनाश कांबळे दीपक चव्हाण, प्रथमेश कांबळे, आशिष कुरणे, अमित कुरणे,प्रमित बनगे,रोहित चौगुले, धीरज थोरात, अमर धनवडे, अमोल वाघे,उत्तम कांबळे, कुलदीप गवंडी, राज कुरणे, स्वरूप सुतार, मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.