जिल्हयातील CCC/DCHC/DCH व सर्व खासगी रूग्णालयातील माहिती; Facility App वर अद्यावत करून सनियंत्रण करण्यासाठी समिती गठीत
कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
जिल्हयात पुन्हा कोव्हीड -19 संसर्गाच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. जिल्हयातील CCC/DCHC/DCH व सर्व खासगी रूग्णालयातील माहिती Facility App वर अद्यावत करून सनियंत्रण करणे आवश्यक आहे. याकामी उपजिल्हाधिकारी निवडणूक, भगवान कांबळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
क्र. अधिकारी यांचे नाव पदनाम
1 श्री. भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी निवडणूक, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर मो. क्र. 8975337722
2 डॉ. यु. जी. कुंभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. कोल्हापूर मो. नं. 8459780768
3 डॉ. संतोष तावशी जिल्हा साथ रोग तज्ञ आरोग्य विभाग जि. प. कोल्हापूर मो. नं. 9900776800
4 श्री. शरद जाधव डाटा मॅनेजर जि. प. कोल्हापूर मो. नं. 8796809660
वरील अधिकारी / कर्मचारी यांनी याबाबत समन्वय ठेवून जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी अहवाल सादर करावा. तसेच नियुक्त केलेले अधिकारी / कर्मचारी यांनी खालील नमुद केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडवयाच्या आहेत.
१) दैंनदिन Covid 19 Facility App वर माहिती अदयावत आहे का याचे संनियंत्रण करणे.
२) CCC/DCHC/DCH व सर्व खाजगी रूग्णालयांमध्ये ICU Bed, Ventilater Bed, Isolation Bed इत्यादी माहिती दैंनदिन आदयावत झाली आहे का याची पाहणी करणे.
३) CCC/DCHC/DCH व सर्व खाजगी रूग्णालयांमध्ये मास्क, पीपीई किट इत्यादी अत्यावश्यक साहित्य उपलब्धतेची महिती अदयावत केलेली आहे का याची पाहणी करणे.
४) कोरोना विषाणू संसर्गामुळे +ve रूग्णांचे Admission, Discharge व Death याबाबतची माहिती दररोज अदयावत केलेली आहे कि नाही याची पाहणी करणे.
५) कंटेनमेंट झोन ची माहिती संबंधित यंत्रणेकडून Online Portal वर दररोज भरले जात असलेबाबतची खात्री करणे.
६) गृह अलगीकरण असलेल्या रूग्णांची Admission, Discharge व Death याबाबतची माहिती दररोज अदयावत केलेली आहे कि नाही याची पाहणी करणे.
७) प्रत्येक रुग्णालयात दैनंदिन मृत्यूबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्धारित केलेल्या नमुन्यात माहिती संकलित करुन सादर करणे.
८) उपरोक्त् नमूद सर्व माहिती अदयावत झाली नसल्यास संबधित संपर्क अधिकारी यांना सुचना करून ती अदयावत करून घेणे. कोव्हीड -19 चाचण्या व अहवालाशी संबंधित आरोग्य विभाग आणि ICMR Portal वरील इतर सर्व प्रकारचे कामकाजावर नियंत्रण करणे.
आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेशान्वये कळविले आहे.