स्त्रिया सामर्थ्यवान आहेत। प्राचार्या बडस्कर

बिद्री प्रतिनिधी :
भारतीय स्त्रिया पूर्व काळापासून आजकाळापर्यत सामर्थ्यवान आहेत कारण तिने सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूरच्या उपप्राचार्य प्रा.डॉ.ऋतुजा बडस्कर यांनी केले.
त्या बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयात महिला सबलीकरण समितीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त कोरोनंतरचे स्त्री भावविश्व या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. डॉ.बडस्कर पुढे म्हणाल्या, कोरोना सारख्या जागतिक महामारीत कुटूंब व समाज सांभाळण्याचे महान कार्य स्त्रियांनी केले.बाहेरचे व उघड्यावरचे खाद्ययपदार्थ खाऊन आरोग्य बिघडवून घेण्यापेक्षा आपल्या आजी, आई,मावशी, आत्या,बहिणी यांच्याकडून पाककृती बरोबर भारतीय संस्कृतीचे संस्कार आत्मसात करा ती काळाची गरज आहे.परकीय संस्कृतीचे बेगडी जोखड झुगारून आपण भारतीय संस्कृतीचे जतन करावे तरच कुटुंबव्यवस्था टिकून राहील.स्त्रीकडे सहनशीलता,प्रसंगावधान, व्यवस्थापन,व्यवहारज्ञान या नैसर्गिक गॊष्टी आहेत त्याचा सकारात्मक विचार करून स्वतःसह इतरांना घडवा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
प्रास्तविक डॉ.जे.एम.पाटील यांनी,ओळख प्रा.पूजा पाटील यांनी तर स्वागतगीत श्रुतीका पोतदार हिने सादर केले कु.स्नेहल कुलकर्णी हिने शुभेच्छा दिल्या. प्रा.आर.बी.चोपडे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना पेढे वाटप केले. यावेळी कोरोना योद्धा अठरा महिलांचा ग्रँथ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.श्री.अतुल नगरकर,सौ.सरिता पाटील, प्रा.गौरी सूर्यवंशी, प्रा.पूजा महाडेश्वर, श्री.संजय गुरव श्री.बाबासो पोवार व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.कु.श्रुतिका सुतार हिने सूत्रसंचालन तर कु.प्रियांका पाटील हिने आभार मानले