कोगनोळीत अरिहंत ग्रुपकडून कोविड योद्ध्यांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण

कोगनोळी :
कोरोना काळामध्ये आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोक रस्त्यावर उतरून काम करत आहेत. अशा या कोविड योद्ध्यांना बळ देणे आवश्यक आहे. अरिहंत ग्रुपच्या वतीने उद्योजक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य व महसूल विभागातील कर्मचारी या सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे, असे मराठा मंडळ ट्रस्टचे उपाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले. ते कोगनोळीमध्ये कोविड योद्ध्यांना जीवनावश्यक साहित्य वितरण प्रसंगी बोलत होते.
आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभाग, महसूल विभाग व ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशा 75 व्यक्तींना साखर, गहू, ज्वारी, तांदूळ प्रत्येकी पाच किलो तसेच मीठ, तेल, चहा पावडर व साबण असे जीवनावश्यक साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी प्रवीण पाटील ,महेश पाटील ,प्रकाश गायकवाड, रामचंद्र कागले ,महादेव इंगवले, कीर्ती पाटील, विजय लोखंडे ,विठ्ठल मुरारी कोळेकर, सचिन परीट, सुजित माने, योगेश पाटील, अमोल पाटील, प्रतीक पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.