आदमापूर येथे ३८ बेडचे कोविड सेंटरचे; उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी यांंचेहस्ते उद्घाटन; बाळूमामा हॉस्पिटल, आदमापूर येथे कोरोना रुग्णांना मिळणार ३८ ऑक्सिजन बेड शासकीय दराने ग्रामीण भागातील रुग्णांना होणार फायदा.

मुदाळतिट्टटा प्रतिनिधी :
आदमापूर ( ता.भुदरगड ) येथील बाळूमामा हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये २० बेडचे कोविड सेंटर रविवार दि.२३ मे सुरु करणेत आले.सदर कोविड सेंटरचे उद्घाटन भुदरगडचे उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी यांंचेहस्ते फित कापून झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून देवस्थानचे अध्यक्ष- धैर्यशिल भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम होते.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणत प्रसार झाला असून ग्रामीण भागामध्ये कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची ऑक्सीजन बेड अभावी गैरसोय होवू नये याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळी यांच्यासोबत चर्चा करून महात्मा जोतीबा फुले योजनअंतर्गत समावेश असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर शासकीय दरामध्ये उपचार करण्याबाबत चर्चा केली होती. त्याअनुषंगाने आदमापूर, (ता.भुदरगड )येथील बाळुमामा ट्रस्टच्या व्यवस्थापकांसमवेत चर्चा करून येथील बाळुमामा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना २० ऑक्सीजन बेड शासकीय दरामध्ये रविवार दि.२३ मे पासून उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली होती.
त्यानुसार आज रविवारी २३ मे रोजी आदमापूर येथील बाळुमामा हॉस्पिटलमध्ये २० आॕक्सिजन बेड तर खाजगी इमारतीमध्ये १८ बेड असे ३८ बेड असलेले कोविड सेंटर सुरु झाल्याने कोविड रुग्णांसाठी हे सेंटर सोईस्कर झाल्याचे समाधान ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये पसरले आहे.सदर कोविड सेंटरमध्ये कोविड बाधीत रुग्णांवर डाॕ.विजय बंडगर आणि त्यांचे आरोग्यसेवक करणार आहेत.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती भुदरगडचे डाॕ.सचिन यत्नाळकर सरपंच विजयराव गुरव, ,राजाभाऊ माळी, ट्रस्टी रावसाहेब कोणकेरी, व्यवस्थापक अशोकराव पाटील,पत्रकार प्रा.शिवाजी खतकर,प्रा.शाम पाटील,साताप्पा पाटील,राजेंद्र कांबळे उपस्थित होते.