ताज्या बातम्या
संकल्प सेवा फाऊंडेशन यांच्या वतीने आमजाई व्हरवडे येथे मास्क वाटप

कौलव प्रतिनीधी : संदीप कलिकते
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोरोना विषाणू बचाव होण्यासाठी आ व्हरवडे येथील सामाजिक कार्यक्रर्ते आणि ग्राम पंचायत सदस्य धीरज करलकर यांच्या संकल्प सेवा फौंडेशनच्या वतीने आमजाई व्हरवडे ता.राधानगरी जि कोल्हापूर येथे संपूर्ण गावामध्ये घरोघरी साधारण 3000 मास्कचे वाटप करणेत आले.आणि समाजातील सर्व घटकांनी वाढत्या कोरोना पासुन योग्य ती काळजी घ्यावी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन कोरोनाला हद्दपार करणेसाठी आणि जनजीवन विस्कळीत झालेल्या कुठूंबांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
या उपक्रमामध्ये फाऊंडेशन चे सचिव अरूण ढेरे,निवास पाटील,अजय पाटील,सविता अ.ढेरे. सुहास लिंगडे,यांनी सहभाग घेतला.