ग्रामीण भागात कोरोनामुळे हार व्यवसायिक आर्थिक संकटात

सावरवाडी प्रतिनिधी :
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विविध कार्यक्रम बंद पडले आहेत .लॉकडाऊनच्या काळात झेंडू , निशिगंध , फुलांचे बाजारपेठेत दर कोसळले गेले आहेत . कोरोनाच्या काळात मंदीरे बंद असल्याने ग्रामीण भागात हार व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहे . दररोजचा रोजगार बुडाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .
एप्रिल मे महिन्यात ग्रामीण भागात पिवळा, नारंगी,झेंडू चे उत्पादन घटले . कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर ग्रामीण भागात दैव दैवतांची मंदीरे बंद आहेत . विविध सांस्कृतिक , धार्मिक,राजकीय कार्यक्रम बंद आहेत . लग्न सोहळे ही रद्द झाले आहेत . शहरी बाजार पेठेत फुलाची आवक कमी झाली आहे. फुलांचे दरही कोसळू लागले आहेत . .लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे पाठ फिरविल्याने फूल मार्केट डाऊन झाले . ग्रामीण भागातील हार व्यवसायिकांना सध्या कोरोनामुळे आर्थिक फटका बसल्याने हार व्यवसायिक हवालदील झाले आहेत