ताज्या बातम्या
महागोंड येथील उत्तम शिंदे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
महागोंड तालुका आजरा येथील सुपुत्र उत्तम धोंडिबा शिंदे यांची गुन्हे शाखा मुंबई शहराच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून त्यांच्या या निवडीने पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे शिंदे यांनी आता पर्येंत पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल,पोलीस नायक,पोलीस हवालदार,स पो नि,अशा विविध पदावर उल्लेखनीय अशी 33 वर्ष सेवा बजावली असून पोलीस दलात त्यांना उत्कृष्ट असा शेरा मिळाला आहे