मुरगूड ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड उपचार केंद्र सुरू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयमध्ये ३० बेडचे कोविड समर्पित उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून त्यामध्ये सहा ऑक्सीजन बेडचा समावेश असणार आहे . या उपचार केंद्राचे आज तहसिलदार शिल्पा ठोकडे व जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ . मनीषा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले .
मुरगूड व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे याची लोकप्रतिनिधीनी व शासनस्तरावर दखल घेण्यात आली .विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री ना . हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतल्यामूळे आज तातडीने मुरगूड ग्रामीण रुग्णालयात खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून निर्माण केलेल्या अतिदक्षता विभागात कोवीड समर्पित उपचार केंद्र सुरु करण्यात आले . त्याचे लोकार्पण कागलच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे , जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ . मनीषा देसाई , गटविकास अधिकारी सुशील संसारे , मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
या कोविड समर्पित उपचार केंद्रात ३०बेडची व्यवस्था करण्यात आली आहे . त्यामध्ये ६ बेड ऑक्सिजन बेड आहेत .१५ जम्बो सिलिंडर ठेवण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले .
ग्रामीण भागातील व मुरगूड शहरातील कोवीड रुग्णांनी या सर्व सोयीनी युक्त असणाऱ्या उपचार केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष राजेखान जमादार व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ बी एन्.डवरी यांनी केले . येथे पूर्ण क्षमतेने औक्सिजनचे ३० सुसज्ज बेड लवकरच सुरू होणार आहेत व त्यासाठी स्वतंत्रपणे डॉक्टर व आरोग्य सेवक कार्यरत राहाणार आहेत .
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अभिजित शिंदे , डॉ . अमोल पाटील नगरसेवक विशाल सुर्यवंशी , डॉ . कुंभार , अभियंता प्रकाश पोतदार , जयवंत गोधडे , अमर कांबळे , विजय मोरबाळे , सजैराव कदम , राजु गोध्दे ,विनायक् पाटील ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवक व पालिका कर्मचारी उपस्थित होत