शिंदे फाउंडेशन तर्फे 3690 शेणी पंचगंगा स्मशानभूमी कडे केल्या सुपूर्द

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
श्री आनंदराव श्रीपतराव शिंदे फाउंडेशन तर्फे पाचगांव येथे शेणी दान हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत 3690 शेणी जमा करण्यात आल्या या जमा शेणी चा टेम्पो रविवारी पंचगंगा स्मशानभूमी कडे रवाना करण्यात आल्या.
मनपा प्रशासनाने स्मशानभूमीतील शेणींचा तुटवडा भरून काढण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांना शेणीदान करण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत शिंदे फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबविला या जमा शेणी पंचगंगा स्मशानभूमी येथे सुपूर्द करण्यात आल्या या उपक्रमाचे कौतुक करत मनपा प्रशासनाने आभाराचे पत्र शिंदे फाऊंडेशनला दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सचिन शिंदे, सरपंच (लोकनियुक्त) मा.संग्राम पाटील, एम. एस. पाटील, संदिप शिंदे, संजय शिंदे, अभय शिंदे, बबन पाटील, विजय शिंदे, राकेश गांजवे, सुरेश पाटील, राजू पाटील, उत्तम गाडगीळ, रविराज कुलकर्णी, शिवाजी जांभळे, आदी सर्व मॉर्निंग ग्रुप पाचगाव च्या सभासदांनी परिश्रम घेतले.