ताज्या बातम्यासामाजिक
कु.रीहा रणजीत चव्हाण हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना रुग्णांसाठी उपयोगी साहित्याचे वाटप

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कन्या कु.रीहा रणजीत चव्हाण हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आज ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे कोरोना रुग्णांसाठी मास्क,सॕनिटायजर,अंडी,केळी यांचे वाटप करण्यात आले.तसेच कोरोना काळात अविरत सेवा बजावणारे पोलिस दल,वैद्यकिय अधिकारी,सोशल मिडया, पत्रकार,ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोराना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाॕ.जी.बी गवळी साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.आर.आर.शेटे साहेब,पोलिस निरीक्षक उदय डुबल साहेब,विनोद घुले,कृष्णात यादव साहेब,बजरंग पाटिल साहेब,चर्मकार समाज सेवा संस्था महाराष्ट्रचे कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष श्री.रणजीत शिवाजीराव चव्हाण,मा.सरपंच श्रीम.अनिता चव्हाण,रीहा चव्हाण,सौ.राही रणजीत चव्हाण,प्राजक्ता पोवार,प्रेम पोवार,पांडुरंग चव्हाण,जयवंत चव्हाण उपस्थित होते.