कोविड योद्ध्यांना अल्प आहाराचे वाटप; किरण पाटील यांचा उपक्रम

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोरोना महामारी काळात आपल्या जीवाची पर्वा न करता शहरात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचारी व आरोग्यसेवक यांची दिवसभर काम करताना दमछाक होते. याचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेसचे किरण पाटील यांनी या सर्वांना अल्पोपहाराचे वाटप केले.
विविध सामाजिक उपक्रम राबवून कोरोना काळामध्ये आजवरच्या अनेक सामाजिक उपक्रमांमधून किरण पाटील यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. कोरोना यांचा सन्मान, सैनीटायझर वाटप, परिसरातील निर्जंतुकीकरण यासारख्या अनेक कामातून सामाजिक कार्यकर्ते तथा युवक काँग्रेसचे किरण पाटील कार्यरत आहेत.
आज आरोग्य सेवक तथा पोलीस कर्मचारी यांना कोल्हापुर शहरात जागो जागी जाऊन किरण सिद्धाप्पा पाटील व परिवार यांच्या वतीने भंडग व बिस्किट वाटप करण्यात आले.
यावेळी किरण पाटील पियुष वनकुद्रे, प्रथमेश पाटील हे उपस्थित होते.