ताज्या बातम्या
कौलव हायस्कुल व ज्युनियर काॕलेज कौलव चे स्काऊट गाईड राज्य पुरस्कार स्पर्धेत धवल यश

कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते
सन२०२०-२०२१ शैक्षणिक वर्षात भारत स्काऊट गाईड महाराष्ट् राज्य यांचे वतीने आयोजीत “राज्य पुरस्कार”स्पर्धेत कौलव हायस्कुल व ज्युनियर काॕलेज कौलवच्या खालील स्काऊट व गाईडसनी राज्य पुरस्कार मिळवून शाळेचे नाव राज्यात उज्वल केले आहे .धनश्री कलिकते,सुश्मिता पाटील,समिक्षा पाटील ,समृध्दी पाटील श्रुतीका पाटील,शिवानी पाटील,तेजल पाटील सिध्दीका सोनाळकर ,पायल सोनाळकर समृध्दी तमायचे या गाईडसनी व सार्थक पाटील या स्काऊटने यश प्राप्त केले आहे.या सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या आशालता सरनाईक मॕडम , शाळेचे मुख्याध्यापक श्री ऐ टी पाटील सर इतर सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सचिव आणि संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.