राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांकडून रूग्णालयातील उपचारपध्दतीबाबत समाधान व्यक्त – अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे

कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे
राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांनी सी.पी.आर.रूग्णालयांतील उपचाराबाबत समाधान व्यक्त केले असून कोविड बाधित रूग्ण उशिरा रूग्णालयात दाखल झाल्याने मृत्युचा संख्येत वाढ होत असल्याचे नमूद केले आहे. अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या व कोरोनामुळे वाढलेले मृत्यू या अनुषंगाने राज्य टास्क फोर्सने जिल्ह्याचा आढावा घेवून आवश्यक त्या उपाययोजना सूचविण्याकरिता काल भेट दिली. शासनाच्या sop नुसारच सी.पी.आर.रूग्णालयात सर्व रूग्णांवर उपचार केले जातात याबाबत टास्क् फोर्सने उपचार पध्दती योग्य असल्याचे बैठकीत नमुद केलेले आहे.
कोविडमुळे मृत्यू पावणाऱ्या रूग्णांचे डेथ ऑडिट वेळोवेळी करण्यात आले असून संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्याकडून आठवड्यातून दोन वेळा आढावा घेतला जातो, कोविड कालावधीत सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ तसेच वर्ग 4 कर्मचारी यांना प्रशिक्षण घेण्यात आले आहे. यामध्ये 975 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, रूग्णालयात नियमावलीनुसारच रूग्णांच्या उपचार पध्दतीत त्रुटींमुळे मृत्यू झालेला नाही, असे यात म्हटले आहे.