ताज्या बातम्या
समाजरत्न सुरेश तामोत राज्यस्तरीय कोविड योद्धा सन्मानपत्र ने सन्मानित

प्रतिनिधी :
अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आणि विश्वात्मक मराठी साहित्य परिषद (द्वारा मविलोअ) यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या अत्यंत लक्षवेधी
कोरोना योद्धा समाज रक्षक महासन्मान 2021 या ऑनलाईन उपक्रमामध्ये कोरोना संकटात
श्री.सुरेश तामोत यांनी केलेले उल्लेखनीय सामाजिक कार्य, रुग्ण सेवा, जनजागृती, प्रबोधनपर सेवा आणि आरोग्य विषयक प्रकल्प या गौरवास्पद कार्यासाठी “खास महासन्मान मानपत्र” ऑनलाईन सोहळ्यात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आले.