रेंज नसतानाही पाटगांव रुग्णालयात लसीकरणाचे आदर्श नियोजन.

पाटगांव प्रतिनिधी :
कोवीड महामारी काळात लसीकरणाची मोहीम जोर धरत असताना पाटगांव ग्रामीण रुग्णालयात रजिस्ट्रेशन साठी नेटची रेंज नसल्याने कर्मचारी वर्गाची तारांबळ उडत आहे. या रुग्णालयाच्या अंतर्गत भुदरगड तालुक्यातील अतिग्रामीण व डोंगराळ भाग जास्त आहे. चिक्केवाडी सारख्या भागातून माणसे येत असतात. त्यामुळे त्यांना सेवा देण्यासाठी येथील कर्मचारी नेट च्या रेंज साठी कधी उन्हात कधी उंचवट्यावर कधी रस्त्यावर उभे राहून रजिस्ट्रेशन चे काम करतात पण लशीकरणात अडथळा येऊ देत नाहीत. बऱ्याचदा फोनलाही रेंज नसते. भुदरगड मधील या गैरसोयीची लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे. येथील वैद्यकीय अधिकारी ए वाय वर्धम , आरोग्य सहा अधिकारी अवि पाठक, कपिल ढोणुक्षे, प्रतिक्षा इंदुलकर, एस डी भोईटे,किशोर पाटील, रुपेश पांढरे, गोकुळा पाटील, आर एस मालवेकर, नीता पाटील, अनिल सावंत,राजर्षि पाटकर,सरीता बागडी,आर एस पाटील हे कर्मचारी आहोरात्र राबत आहेत. अशा कर्मचारी वर्गाचे कौतुक होणे गरजेचे आहे.