कोरोनाच्या विळख्यात सापडलेले लोटेवाडी गांव पदाधिकारी, ग्रामस्थांच्या सतर्कतेमूळे संकटातून बाहेर.

गारगोटी प्रतिनिधी :
भुदरगड तालुक्याच्या मिणचे खोरीतील लोटेवाडी या छोट्याशा गावाला कोरोनाने विळखा घातला नी डोंगर कपारीत राहाणाऱ्या या कणखर अबालवृध्दांनी न डगमगता मोठ्या संयमाने सात दिवसरात्र घरात काढून कोरोनाला हरवले आणि सर्वासमोर एक आदर्श स्थापन केला.आजघडीला कोरोना गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही.
एक संवेदनशील गांव अशी ओळख असूनही संकट काळात सारे विसरून या गावाने जी एकी दाखवली ती कौतुकाची असल्याचे येथील पत्रकार धनाजी देसाई यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसापुर्वी या गावात १५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.सारे गाव हादरले .एका युवकाचा कोरोनाने मत्यूही झाला.गाव कधी नाही इतक्या मोठ्या संकटात सापडला.टप्याटप्याने रुग्ण वाढत गेले नी सारे गांव चिंताग्रस्त झाले. प्रत्येकाची चिंता वाढत गेली.या कठिण प्रसंगी आरोग्य विभाग सरसावला, ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे सदस्य सारे एकटवले, आरोग्य परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस, सारे शिपाई, कर्मचारी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कोरोना दक्षता समिती यांनी सारे प्रामाणिकपणे एकदिलाने कामाला लागले.गावच्या साऱ्या अबालवृध्दांचे समुपदेशन केले. प्रत्येकाने कमालीची सावधानता बाळगली.सामाजिक अंतर राखले, मास्क लावले.वरचेवर हात साबनाने धुतले. प्रत्येकाच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि मरणाच्या खाईत लोटत चालेलला गांव या एकजुटीने शिताफीने बाहेर आला. संकटकाळात एखाद्या गावाने अशी एकजूट दाखवली तर काय होवू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लोटेवाडी.
लोटेवाडी गावात आजही कोणी कोणाच्या घरी जात नाहीत.गावातील सर्व व्यवहार सात दिवस कडकडीत बंद ठेवले.गावच्या सरपंच सुनिता सुनिता साताप्पा परिट, उपसरपंच तानाजी साठे, ग्रामपंचायत सदस्य सावित्री देसाई, शोभा सारंग, संजय कांबळे, सुदर्शम गुरव, स्नेहल सरवंदे,पोलीस पाटील शांताराम भालेकर, ग्रामसेवक पुनम पाटील, प्राथमिक आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी आदिंनी ही साखळी तोडण्यात पुढाकार घेतला.
आज गारगोटी शहरात व आजुबाजूच्या काही गावात कोरोनाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. गारगोटी कोविड सेंटर रुग्णांनी खचाखच भरच चालले आहे.अशा कठिण या कोरोना महामारीला संपवायचे असेल तर लोटेवाडीसारख्या लहानशा गावाचा आदर्श घ्यायला हवा.गारगोटीतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात ताळमेळ नसल्याने कोरोनाने फास आवळायला सुरु केले आहे. शहरातील परिस्थीती चिंतेची आहे तरिही गारगोटी शहर १०० % लाकडाऊन होत नाही. याबध्दल जाणकार नागरिकांच्यातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.