जिल्ह्यात रेमडीसीवरचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाय योजना करा, अन्यथा अमरण उपोषण : आम आदमी पार्टी ने दिला इशारा

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
“यापुढे रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखाण्यासाठी प्रभावी ऊपाययोजना न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार”. आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदिप देसाई यांचा कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यानां ईमेल द्वारे इशारा
मा. जिल्हाधिकारी कोल्हापुर यांना मेल द्वारे केलेले निवेदन
प्रति,
मा. जिल्हाधिकारी,
कोल्हापूर
विषय- रेमडेसिव्हीरचा काळा बाजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याबाबत..
संदर्भ- दि. 6 मे रोजीचे आपल्याला ईमेल द्वारे पाठवलेले पत्र
मा. महोदय,
कोल्हापुरात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या मृत्युंच्या संख्येबरोबरच रेमडेसिव्हीरचा काळाबाजारही मोठया प्रमाणात फोफावत आहे. शासन स्तरावर रेमडेसिव्हीरचे रेशनींग करण्याची सिस्टम कार्यरत आहे, तरी सुध्दा यामधील त्रुटीचा फायदा घेत रेमडेसिव्हीरचा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे. या त्रुटी सुधारण्यासाठी आम्ही काही डॉक्टरांशी चर्चा करुन काही मुद्दे आपल्याला मागील (दि. 6 मे रोजीचे) निवेदनात सुचवले होते.
कोविडच्या कठिण काळातही काही हॉस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफ रुग्णांची अतिशय मनोभावे सेवा करीत आहेत, त्यांचे मनापासून अभिनंदन. पण काही हॉस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफ आपल्या यंत्रणेतील त्रुटींचा फायदा घेत रुग्णाच्या नातेवाईंकाना चढ्या दराने रेमडेसिव्हीर विकत आहेत.
नुकत्याच कोल्हापुरातील 2 हॉस्पिटलमधे रेमडेसिव्हीरचा काळा बाजार पकडला गेला. अशी घटना घडणे म्हणजे, व्यवस्थेनेच रुग्णांचा एक प्रकारे बळी घेणे आहे. या प्रकरणाची माहिती घेतली असता, यामध्ये रुग्णालयातील कोविड रुग्णांवर उपचार करताना शिल्लक राहिलेली रेमडेसिव्हीरची इंजेक्शन ज्यादा दराने बाहेर विकण्याचे काम चालू आहे या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळत आहे. म्हणजेच प्रशासनाने रुग्णासाठी दिलेल्या रेमडेसिव्हीरचाच वापर काळ्याबाजारासाठी होत आहे व त्यामध्ये हकनाक रूग्णांचा बळी पडत आहे.
तरी यापुढे अश्या घटना होवु नये यासाठी प्रशासनातील त्रुटीचा अभ्यास करुन आम्ही खालील मागण्या या निवेदना द्वारे करीत आहोत:
1. प्रत्येक हॉस्पिटल कडून रेमडेसिव्हीरच्या डीमांड येत असताना पेशंटची संख्या व नावाबरोबरच रेमडेसिव्हीरसाठी पेशंटची प्रायोरीटी ठरवण्यात आलेली असावी.
2. आदल्या दिवशी दिलेले रेमडेसिव्हीर प्रायोरीटीनुसार दिल्याचा रीपोर्ट असावा. व त्यामध्ये रुग्णाला सध्यस्थितीत किती रेमडेसिव्हीर दिले व अजुन कितीची गरज आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा.
3. ज्या पेशंटचा नावाने आपण रेमडेसिव्हीर दिलेले आहे त्याला त्याची फोन अथवा मेसेजद्वारे माहिती द्यावी.
4. आपण प्रत्येक हॉस्पिटल मध्ये लेखापरीक्षक नेमले आहेत, त्याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशा नुसार एक स्पेशल स्कॉड नेमून त्या स्कॉडकडून ठरवून दिलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हीर मिळाले की नाही याची खात्री करुन घ्यावी व तसे आपल्या कार्यलयास कळवणे बंधनकारक करावे.
5. आजपर्यंत रेमडेसिव्हीरच्या काळाबाजारामधे सामील असलेल्या हॉस्पिटल/डॉक्टर व इतर स्टाफ यांची निःपक्षपातीपणे विशेष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व यामधे ज्याव्यक्ती प्रथम दर्शनी दोषी आढळल्या आहेत, त्यावर समाधान न बाळगता त्याच्या मूळापर्यंत जावुन इतरही दोषीवर तात्काळ कारवाई करावी.
वरील उपाययोजना करुन व त्याच बरोबर दोषींवर कडक कारवाईकरुनच आपल्याला रेमडेसिव्हीरचा काळा बाजार आटोक्यात आणण्यास मदत होईल, व याचा फायदा सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवणे यासाठी होईल.
तरी आपण वरील मागान्यांचा विचार करुन त्यावर त्वरीत अंमलबजावणी करावी अन्यथा यापुढे रेमडेसिव्हीरच्या काळाबाजाराचे एकही प्रकरण घडल्यास आपल्या कार्यलयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.