महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अरविंद पाटील.

धामोड प्रतिनिधी : प्रतिश पाटील
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अरविंद पांडुरंग पाटील रा.धामोड यांची नुकतीच निवड झाली. निवडीची घोषणा केल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा पश्चीम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाजीराव फराकटे यांनी केली आहे.
अरविंद पाटील हे सामाजिक, सांस्कृतिक,पत्रकार क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत असून त्यांच्या कार्याची त्यांना मिळालेली ही पोहच पावती आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेला संघ असून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत आहे .या निवडीने त्यांचे अभिनंदन होत आहे.
यापुढे आपण असंघटीत पत्रकारांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रवाहात आणून त्यांच्या समस्या सोडवून त्यांचे जीवनमान उन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार असलेचे त्यांनी निकाल न्युजशी बोलताना सांगितले.