ताज्या बातम्या

मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलेबद्दल होनेवाडी येथील युवकांनी सामूहिक मुंडण करत नोंदवला निषेध

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण म हाराष्ट्रभर अतिशय शांततेत निघालेले ५८ मूकमोर्चे तसेच ४२ मराठा युवकांनी या न्यायहक्कसाठी दिलेले बलिदान या सर्व गोष्टींना तिलांजली देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवले या निर्णयाचा जाहीर निषेध करत होनेवाडी ता.आजरा येथील राजर्षि शाहू व्यायाम शाळेच्या जवळ जवळ २५ कार्यकर्त्यांनी सामूहिक मुंडण केले.

कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव त्यात शासनाने घालून दिलेल्या नियम अटी शर्तीचे पालन करत लोकशाही मार्गाने निषेध नोंदवत मराठा समाजाची एकजूट आजूबाजूच्या पंचक्रोशीसह सर्वच गाव खेड्यानी दाखवावी असे आवाहन ही व्यायाम शाळेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks