ताज्या बातम्यासामाजिक

लग्नाच्या व मुलगीच्या वाढदिवसा दिवशीचा अनावश्यक खर्च टाळून पंकज इंगळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

नंदगाव प्रतिनिधी :

पंकज इंगळे चीफ मॅनेजर बँक ऑफ बडोदा कोल्हापूर यांच्या मुलीचा वाढदिवस आणि लग्नाचा सुद्धा वाढदिवसा दिवशी चा सर्व फालतू खर्च टाळून गरीब व लाकडं मुळे रोजगार बंद झालेल्या बेरोजगार कुटुंबीयांना अन्न धान्याचे 20 किट तयार केले तसेच यांच्या या कार्याला शुभा पाटील यांनी हि दहा हजार रुपयाच्या दैनंदिन व जीवणावश्यक वस्तूंचे वाटप केलेे.या वस्तू जवाबदारी मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्या कडे दिले.

राधानगरी तालूका अध्यक्ष याकूब बक्षु यांच्या मदतीने पडसाळी येथील धनगर वाडयातील गरीब व गरजू लोकांना त्यांच्या राहत्या घरी जाउन मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट कोल्हापूर व छत्रपती राजश्री शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या वस्तूंचे वाटप केले. अतिशय बिकट काळामध्ये मिळालेल्या या मदतीमुळे धनगर वाड्यातील लोकांनी पंकज इंगळे, शुभा पाटील, मानवाधिकार समितीच्या व छत्रपती राजश्री शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अगदी भाऊक होऊन आभार मानले.

या वेळी मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट व छत्रपती राजश्री शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थे चे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष एम एम शेख , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे , उपाध्यक्ष महेश नंदे , जिल्हा सचिव शमशूदिन जमादार , राधानगरी तालुका अध्यक्ष याकूब बक्षु , सामाजिक कार्यकर्ते जैनुल तासिलदार ,अमन बक्षु , सोहेल जमादार हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks